
थेट खरेदी योजना
विकास प्रकल्प रोजगारासाठी नवीन मार्ग खुले करतात. राज्यातील संपर्क सुधारण्यासाठी हा विकास प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे वस्तू आणि सेवांची वाहतुक वेगवान होणार असून प्रमुख केंद्रे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. या विकास प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगाराच्या नवीन संधी, औद्योगिक क्षेत्राचा विकास, शेतीतील उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी आवश्यक अशा मेगा प्रकल्पात अनेकदा भूसंपादन करणे आव्हानात्मक होते. भारताच्या बर्याच भागांमधील जमीन मालकी ही गुंतागुंतीची आहे, त्यामुळे खासगी संस्थेसाठी जमीनीचे थेट अधिग्रहण करणे एक मोठे आव्हान आहे.
-
जमिनींचे अधिग्रहण करताना आर्थिक व्यवस्थेचे बळकटीकरण व जमिन मालकाला फायदा व्हावा हे लक्षात घेऊन भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा (एलएआरआर) याद्वारे भुसंपादन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला.हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेली जमीन महाराष्ट्र राज्यमार्ग (दुरुस्ती) अधिनियम, २०१८ च्या कलम १९ जे च्या अंतर्गत जमीन एकत्रीकरण व भूसंपादन किंवा थेट खरेदी योजना या दोन्ही माध्यमातून केली गेली आहे. याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.रेडी रेकनर रेटचा वापर करून जमीनीचे दर ठरवण्यात येणार आहेत. या जमीनीच्या दरात झाडे, घरे, विहिरी आणि शेतातील अशा इतर मालमत्तांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या प्रकल्पात स्वच्छेने भाग घेण्यासाठी सहमत असलेल्या जमीन मालकाला २५ टक्के मानधन मिळेल. रेडी रेकनर रेटप्रमाणे ठरविलेल्या किंमतीच्या दुप्पट किंमत व १०० टक्के नुकसान भरपाई, जमीनमालकास त्याच्या जागेच्या मूळ किंमतीच्या ५ पट अधिक रक्कम देण्यात येईल.एलएआरआरनुसार शहरी भागातील नुकसान भरपाईची रक्कम १ आहे आणि ग्रामीण भागासाठी १.५ थेट खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून शहरी भागाची नुकसान भरपाईची रक्कम दुप्पट आहे. रेडी रेकनर रेटपेक्षा किंवा विक्रीच्या सरासरी आकडेवारीच्या किंमतीच्या २.५ पट असू शकते, तर थेट खरेदीसाठी नुकसान भरपाईची रक्कम ३ पट असू शकते, रेडी रेकनर रेट किंवा सरासरी विक्री आकडेवारी किंमतीच्या ३.७५ पट असू शकते.उदाहरणार्थ, जमिनीच्या रेडीकनर रेटनुसार प्रति हेक्टर जमीनीची किंमत १,००,००० रुपये इतकी आहे आणि जर ही जमीन शेतीजमीन असेल किंवा ‘ना विकास क्षेत्रात’ येत असेल तर त्या जागेची किंमत दुप्पट म्हणजेच २,००,००० रू. प्रति हेक्टर असेल. जर जमीनमालकाने स्वच्छेने थेट खरेदी योजनेत भाग घेतला तर सरकार या जागेच्या किंमतीच्या दुप्पट किंमत म्हणजेच ४,००,००० रु प्रति हेक्टर जमीनमालकास देऊ करेल. सरकारकडून जमीनमालकला २५% प्रोत्साहन निधी मिळणार आहे. म्हणजे जमिन मालकास प्रति हेक्टर ५,००,००० रुपये मिळतील, ही रक्कम रेडी रेकनर रेटच्या किंमतीपेक्षा ५ पट किंवा सरासरी विक्री किंमत इतकी आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत समित्या आवश्यक कार्यवाही पूर्ण करतील. आणि त्यानुसार नुकसान भरपाई प्रक्रिया पुर्ण होईल. त्यानंतर एमएसआरडीसीकडून जमीन खरेदी करणार्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल.
अद्याप प्रश्न आहे?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता :
नेपियन सी रोड, प्रियदर्शिनी पार्क, मुंबई 400036, महाराष्ट्र, भारत.
संयुक्त कार्यालयाचा पत्ता :
एमएसआरडीसी कार्यालय परिसर, के. सी मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, वांद्रे (प), मुंबई-400050
बद्दल
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.
- 1800 233 2233
- 8181818155
- +91- 22 26417893
- info@msdrc.org
नकाशा