महामार्गाची वैशिष्ट्ये व ठळक मुद्दे
समृद्धी महामार्गाची वैशिष्ठ्ये
- एकूण १२० मीटर रुंदीचा सहा पदरी द्रुतगती मार्ग
- १० जिल्हे, २६ तालुके आणि आसपासच्या ३९२ गावांना जोडणारा महामार्ग
- या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त ८ तासात कापणे शक्य.
- या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग(डिझाईन स्पीड) असेल ताशी १५० किमी
- महामार्गालगत होणार १९ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती
- भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे ११ लाख ३१ हजार वृक्षांची होणार लागवड
- महामार्गाच्या प्रत्येकी पाच किमी अंतरावर असणार सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा
- समृद्धी महामार्गात अत्याधुनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करुन विविध संरचनाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ६५ उड्डाणपूल, ३३ मोठे पूल, २७४ छोटे पूल, ८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, २५ इंटरचेंजेस, ६ बोगदे, १८९ भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी ११० भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचाऱ्यांसाठी २०९ भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी ३ भुयारी मार्ग आणि ३ उन्नत मार्गाचा समावेश असेल.
- समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभिकऱण, सुधारीत पथदिवे, आणि डिजीटल संकेत (सिग्नल) यांचा वापर करण्यात येणार आहे
- समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळ, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे.समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते (इंटरचेंज) यामुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबीका मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत
- समृद्धी महामार्गावर ठराविक ठिकाणी वीजेवर चालणार्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स, तसेच १३८.४७ मेगावॅट उर्जा निर्मिती करणारे सौर उर्जा प्रकल्प असतील
- उत्तम डिजिटल सेवा आणि अन्य महत्त्वाच्या सेवा पुरवण्यासाठी द्रुतगती मार्गासह ऑप्टिकल फायबर केबल्स (ओएफसी केबल्स), गॅस पाइपलाइन, वीजवाहक तारा आणि सुविधा केंद्रे इत्यादीचे नियोजन केले आहे
समृद्धी महामार्गाचे ठळक मुद्दे
- समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमने गाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होईल
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय दळणवळणात आणि मालवाहतूक सुविधेत ६ % योगदान मिळण्याची संभाव्यता आहे
- समृद्धी महामार्गामुळे महामार्गालगत राहणाऱ्या अंदाजे ३६ % लोकसंख्येला फायदा होणार आहे.
- समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी देशातील सर्वात जलद भूसंपादनाचे काम पार पडले. या प्रकल्पासाठी दहा जिल्ह्यांमधून ८ हजार ८६१ हेक्टर जमिनीचे संपादन अवघ्या १८ महिन्यांत पार पडले.
- समृद्धी महामार्गावरुन प्रतिदिन अंदाजे ३० ते ३५ हजार वाहने प्रवास करतील
- मुंबई- नागपूर- रायपूर अंगुल गॅस पाईपलाईन समृद्धी महामार्गातून जाणार आहे. गॅस ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून गॅस पाईपला
- कृषी समृद्धी केंद्रासाठी आवश्यक जमिनीसाठी भुसंचयन म्हणजेच जमीन एकत्रीकरण (लँड पुलिंग ) योजनेचा वापर केला आहे. शेत जमिनीच्या मोबदल्यात ३०% विकसित भुखंड मुळ जमीन मालकांना परत देण्यात येणार आहे.
- The farmers also received Rs 50,000 (as compensation) per hectare for non-irrigated land and Rs 1 lakh every year for irrigated land for the next 10 years.
- भारतीय वन्यजीव संस्थेच्या सल्ल्यानुसार समृद्धी महामार्गालगत अधिवास असणाऱ्या वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी महामार्गाचे बांधकाम करताना याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच वन्यजीवांसाठी महामार्गाखालून भुयारी मार्ग आणि उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.
- समृद्धी महामार्गाचे काम अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ई.पी.सी मॉडेल) तत्वावर सुरु आहे.
- समृद्धी महामार्गाच्या प्रकल्प उभारणीवेळी ३२० प्रशिक्षित संवादकांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळातर्फे प्रकल्पाच्या मार्गिकेत येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनाची माहिती आणि प्रकल्पाच्या भविष्यकालीन फायद्यांची माहिती देण्यात आली. प्रभावीपणे शेतकर्यांबरोबर संवाद साधण्यात यश आले.