उद्देश

पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक-सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हे नमूद करण्यास अभिमान वाटतो की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे. महाराष्ट्र हा जसा गावकुसांच्या अनवट घाटवाटांचा प्रदेश आहे. तसाच तो महानगरांच्या वेगवान महामार्गाचाही प्रदेश आहे. यामध्ये समाविष्ट असलेले राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांतर्गत रस्ते असे रस्त्यांचे अखंड विणलेले जाळे आज संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेत आहेत. आंतरराष्ट्रीय शहर अशी ओळख मोठ्या अभिमानाने मिरवणारे मुंबई असेल किंवा वेगाने प्रगतीच्या दिशेने झेपावणारी राज्याची उपराजधानी नागपूर असेल, प्रत्येक महानगराला महामार्ग व द्रुतगती मार्गाच्या माध्यमातून वेगवान करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.

Road connectivity is the key in bridging the gap between the two metros, while their comprehensive planning plays a crucial role in the state’s economic growth. Down the line, Mumbai-Pune Expressway was one such pilot project which got commissioned between 1998–2000. The expressway connecting Mumbai and Pune reduced the distance and accelerated the pace of economic prosperity. Cities including Mumbai, Pune, Nashik, Aurangabad, and Nagpur significantly strengthen the state’s economy.

दोन दशकांपूर्वी अस्तित्त्वात आलेला ‘यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग’ हा पायाभूत सुविधा क्षेत्रातील पथदर्शी प्रकल्प आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणाऱ्या या द्रुतगती मार्गाने केवळ अंतर कमी केले नाही, तर पायाभूत विकास क्षेत्रात मैलाचा दगड रचला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, गृहप्रकल्प, वाहन उद्योगाच्या पायाभरणीला देशातील हा पहिला द्रुतगती मार्ग पूरक ठरला. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या महानगरांचे राज्याच्या आर्थिक विकासातील योगदान राज्यास बळकटी देणारे आहे. विकासाची ही गंगा राज्यात सर्वदूर पोहोचावी, हाच हेतू उराशी बाळगून राज्य शासनाने महाराष्ट्राच्या दोन मोठ्या महानगरांना जोडण्याचा एक महासंकल्प केला. राज्याचा विकास गतिमान व्हावा आणि महामार्गासोबतच विकासाचा प्रवाह चौफेर व्हावा. याच हेतूने राज्य शासनाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची' नियोजनबध्द निर्मिती केली आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर आरामदायी पध्दतीने पार व्हावे, यासाठी प्रवेश नियंत्रण (Access controlled) असलेल्या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाची आखणी केली.

समृध्दीचा प्रवास होई विनासायास

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणारा महाराष्ट्रातील पहिला सर्वाधिक लांबीचा ग्रीनफिल्ड द्रुतगतीमार्ग ही राज्याची नवी ओळख असेल. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या नावाने हा एक्सप्रेस वे जगभरात ओळखला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी १६ तासांऐवजी आठ तास लागणार आहेत. २४ जिल्ह्यांना लाभ महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे.

The Expressway Will Benefit 24 Districts

The Nagpur Mumbai Super Communication Expressway will pass through ten districts namely Nagpur, Wardha, Amravati, Washim, Buldana, Jalna, Aurangabad, Ahmednagar, Nashik, and Thane. Through interchanges, 14 districts will be indirectly connected to Samruddhi Expressway. Therefore, 24 out of 36 districts in the state will benefit from the Samruddhi Expressway. The districts of Marathwada and Vidarbha will be benefited from the Nagpur Mumbai Super Communication Expressway.

विचार वेगाचा, वसा पर्यावरणाचा

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नियोजनात पर्यावरणाचा विचार आणि वनसंपदेचे संवर्धन ही प्राथमिकता होती. समृद्धी महामार्ग हा वन्यजीव क्षेत्रातून जाणारा द्रुतगती मार्ग असल्याने वन्यजीवांच्या मुक्त संचारात अडथळा येऊ नये, म्हणून डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती उपाययोजना केली. या द्रुतगती मार्गामुळे वन्यजीवांच्या मुक्तसंचारावर गदा येणार नाही, याची नियोजनात्मक काळजी घेण्यात आली. भौगोलिक रचना आणि वन्यजीवांचा अधिवास यांना सहज आणि मुक्त वावर करता येईल, याचा संपूर्ण विचार समृद्धी महामार्गात करण्यात आलेला आहे. या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ विविध संरचना बांधण्यात आल्या आहेत. त्यात, २२ अंडरपास, २ पूल, ४४ बॉक्स कल्वर्टस आणि ८ लहान पूलांचा समावेश आहे.

नव्या वेगवान प्रवासासाठी वेगवान चार्जिंग स्टेशन

समृद्धी महामार्गाच्या बांधणीत नव्या तंत्रज्ञानाचा आणि भविष्यकालीन दळणवळणाचा विचार करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर प्रत्येक ४० ते ५० किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूला वे-साईड अ‍ॅमेनिटीजची (रस्त्यालगतच्या सोयीसुविधा) उभारणी करण्याचे नियोजन आहे. यात अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विजेवर चालणार्‍या वाहनांसाठी (इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ची (आयटीएमएस) सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यात पथकर संकलन प्रणाली (टोल), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि ऑप्टिकल फायबर केबल (ofc) या घटकांचा समावेश आहे.

नव्या वनसंपदेच्या समृध्दीकडे..

समृद्धी महामार्गासाठी वन विभागाची एकूण ५४६ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून वनविभागाला वन विकसित करण्यासाठी इतर ठिकाणी तेवढीच जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. समृद्धी महामार्गाच्या बांधकामात २ लाख ३६ हजार वृक्ष बाधित झाले होते. मात्र, त्याचवेळी ११ लाख ३१ हजार नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे केवळ नवा द्रुतगती मार्गच नाही तर नवी भव्य वृक्षसंपदाही यानिमित्ताने पहायला मिळणार आहे.

नव्या कृषी समृध्दी केंद्राची संपन्नता

समृद्धी महामार्ग हा सर्वार्थाने वेगळा ठरला आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर केलेला सर्वांगीण विकासाचा नियोजनात्मक विचार. प्रत्यक्ष दहा जिल्हे आणि अप्रत्यक्षपणे १४ जिल्ह्यांना विकासाची नवी गंगा प्रदान करणाऱ्या या महामार्गाने काही नवे मापदंड तयार केले आहेत. त्यातील महत्वाचा आणि ठळक असणारा मुद्दा म्हणजे कृषी समृद्धी केंद्राची उभारणी. समृद्धी महामार्गानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने १९ कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहे.

समृद्धी महामार्ग दृष्टीक्षेपात

  • एकूण लांबी ७०१ कि.मी
  • रस्त्यांची रुंदी १२० मीटर ( डोंगराळ भागांसाठी ९० मी )
  • मार्गिका – ३+३ (दोन्ही बाजूस तीन मीटर रुंद पेव्हड शोल्डर आणि दोन मीटर रुंदीच्या मातीच्या शोल्डरसह )
  • वाहन वेग प्रस्तावित(डिझाईन स्पीड) – ताशी १५० कि.मी. (डोंगराळ भागासाठी ताशी १२० कि.मी. )
  • इंटरचेंजेस – २५
  • द्रुतगती मार्गालगत उभारण्यात येणारी नवनगरे- १८
  • .मोठे पूल (तीस मीटरपेक्षा जास्त लांबीचे ) - ३३
  • लहान पूल(तीस मीटरपेक्षा कमी लांबीचे ) - २७४
  • बोगदे – ६
  • रेल्वे ओव्हर ब्रीज – ८
  • व्हाया डक्ट / फ्लायओव्हर - ६५
  • कल्व्हर्ट – ६७२
  • वे-साईड अ‍ॅमिनिटीज- २१ (दोन्ही बाजूस प्रस्तावित )